सेन्सेक्स कोसळला ८ लाख कोटी बुडाले

मुंबई, देशभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात विक्री केली. यामुळे सोमवारी बाजार उघडताच निर्देशांक सुमारे ३००० अंकांनी कोसळलाराष्ट्रीय शेअर बाजारात ८०० अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले. परिणामी शेअर बाजारात व्यवहार ४५ मिनिटांसाठी रोखण्यात आले आहेतआज बाजार उघडताच सेन्सेक्स २७१८ अंकांनी घसरला आणि २७१९७ अंकांपर्यंत सेन्सेक्स खाली आलादिवसभरात सेन्सेक्स ३,९३४ अंकांनी (१३.१५ टक्केकोसळला. सेन्सेक्स २५,९८१ अंकांपर्यंत खाली आलानिफ्टी निर्देशांक १,१३५ अंकांनी (१२.९८ टक्के) घसरून ७,६१० अंकांवर स्थिरावला.