मिठी नदीत कचरा मिसळला जातो. त्यावर गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू आहे. मिठी नदी प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिका मिठी नदी शुद्धीकरणावर काम करत असून लवकरच आपल्याला ही नदी शुद्ध दिसेल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.
पाताळगंगा नदी प्रदूषणात वाढ होत असल्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते. 'नीती' आयोगाकडे दोन वर्षांपूर्वी राज्यातील २१ नद्यांबाबत प्रस्ताव पाठवला आहे. उर्वरित १८ नद्यांमध्ये एसटीपी बसविण्यात येईल, प्रकल्प लावण्यासंदर्भात पाण्याची तपासणी करून अहवाल घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.