देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र . रेल्वे, बस वाहतूक बंद केली आहे. विदेशी विमानांनाही बंदी केली आहे. पण आता देशांतर्गत विमान वाहतूक बंद करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधानांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. खासगी वाहने, टॅक्सी, रिक्षा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी . 'शहरांमध्ये बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी आहेत. टॅक्सी, खासगी वाहने आणि रिक्षाही केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच असतील. नाहीतर त्यांना बाहेर पडता येणार नाही,' असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्बंध जाहीर केले, 'टॅक्सी आणि खासगी वाहनांमध्ये चालक आणि दोनजण प्रवास करू शकतील. रिक्षामध्ये चालक आणि एकजण प्रवासी असेल. अत्यावश्यक असेल तरच परवानगी दिली जाईल; अन्यथा तेसुद्धा बंद करा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा