हाचतोक्षण,हीच ती वेळ...सगळे मिळून संकटावर विजय मिळवू!
मुंबई, 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'विषाणू पसरू नये, जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमाही सील करण्यात येणार आहेत. या संचारबंदीतून जीवनावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. हाच तो क्षणवेळ... आपण सगळे मिळून या संकटावर विजय मिळवू,' विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'फेसबुक लाइव्ह'द्वारे जनतेशी साधताना उपाययोजनांबाबत माहिती दिली. 'आपल्यावरच्या काळजीपोटी मी आपल्याला सूचना देत आहे,' असे सुरुवातीला स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपण अत्यंत निर्णायक टप्प्यावर आहोत. त्याला टर्निंग पॉइंट म्हणा, धोकादायक वळण म्हणा किंवा म्हणा; पण हाच तो क्षण आहे, हीच ती वेळ आहे. विषाणूला आपण शकलो नाही, तर जगभरात जे थैमान घातले आहे, तसा प्रयत्न करेल. पण मला विश्वास आहे. आपली जनता दृढनिश्चयी, लढवय्या जिद्दी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
टाळ्या-थाळ्या वाजवून व्हायरस जात नाही
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला आपण चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानले आहेतच. अभिनंदनही केले आहे. संध्याकाळी आपण टाळ्या, थाळ्या, घंटा वाजविल्याकाहीजणांना वाटले असेल, टाळ्या-थाळ्या वाजविल्यामुळे व्हायरस जाईल. परंतु याने व्हायरस नाही. आपले वीर डॉक्टर, सिस्टर, वॉर्डबॉय, पोलीस यंत्रणा जिवाची बाजी लावून लढते आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी, मानाचा मुजरा करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता टाळ्याथाळ्या होत्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.