राज्यात लवकरच नोकरभरती

७२ हजार शासकीय सामान्य कर्मचाऱ्यांची पदे प्रशासन राज्य भरणार मंत्र्यांची माहिती



मुंबई, (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी ७२ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. सध्या राज्य सरकारच्या ७ लाख ३५ हजार मंजूर पदांपैकी ५ लाख ८५ हजार पदे भरली आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली.


राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या होत असल्याबाबत आमदार जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असतानादेखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने घेतले जात असल्याने सुशिक्षित तरुण बेरोजगार राहत असल्याबद्दल विचारणा केली होती. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी जाहिरात देण्यात आलेल्या ७२ हजार पदांसंदर्भात उपप्रश्न उपस्थित केला होता.


या प्रश्नावर उत्तरात राज्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात मात्र न्यायालयात लवकरात लवकर भक्कमपणे बाजू सरकार मांडेल आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू होईल अशी त्यांनी व्यक्त केली. २१ डिसेंबर २०१६ दरम्यान सहा लाख ९५ हजार पदे मंजूर त्यापैकी पाच लाख ६२ हजार पदे भरण्यात आली. त्यावेळी ८१.१८ टक्के भरती झालेली होती, असे भरणे यांनी नमूद केले.